Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्रातील लाखो महिलांनी या योजनेत अर्ज केले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत एकूण ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी येईल याबद्दल महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे दिले होते.

त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आगाऊ देण्यात आले आहेत. १० ऑक्टोबरला हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले. दरम्यान, आता पुढचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होईल याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

आता लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यात दिला जाईल अशी शक्यता आहे. पुढील महिनाभर आचारसंहिता लागू असल्याने कोणत्याही योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करता येणार नाहीत असे सांगितले जात आहे. त्यामुळे महिलांना पुढील हप्त्यासाठी दीड महिना वाट पाहावी लागेल. (Ladki Bahin Yojana Next Installment) या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठरवण्यात आल्या आहेत. तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. यासोबतच योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. त्याचबरोबर महिलेच्या कुटुंबातील कोणालाही सरकारी नोकरी नसावी आणि कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत नसावा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. (Ladki Bahin Yojana Eligibility)

Leave a Comment